मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे, यावर केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकार ला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले होते., असं ट्विट करत रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकार ला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले होते.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) November 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान नितीश कुमारांना; उद्या घेणार शपथ
अभिनेत्री दिशा पटाणी लाल बिकीणीत मालदीवच्या किनारी; चाहते म्हणाले नोव्हेंबर HOT करून टाकलास
संजय राऊतांकडून ओबामांविषयी नाराजी, निलेश राणे म्हणतात, “आता ओबामांचं काही खरं नाही”
“एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण”