Home महाराष्ट्र “देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

मुंबई : गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.आर. शहा यांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

मोदी हे चैतन्यमूर्ती तसेच द्रष्टे नेते असल्याची स्तुतिसुमने एम. आर. शहा यांनी उधळली आहेत. त्यावर कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मोदी यांनीही लगेच परतफेड करून टाकली आहे. त्यामुळे कुणाला शंका वगैरे घेण्याचे कारण नाही, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे. देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही, असं म्हणत सामनातून मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

ते म्हणतात आम्ही वचन तोडलं, पण…- अमित शहा

“नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, त्याकडे फारसं लक्ष देऊ नका”

मुंबईमध्ये भाजपला अजून एक झटका; अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सचिन तेंडुलकरने आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी- शरद पवार