मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली. मात्र काल रात्री उशिरा राणेंचा जामीन मंजूर झाला. यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.
दोन्ही निकाल माझ्या बाजूनं लागले आहेत. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे., असं नारायण राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“नारायण राणे सत्तेच्या जोरावर तत्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने त्यांची गुर्मी उतरवली”
राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- नितेश राणे
“जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, पुन्हा अटक होणार?”
“राणेंच्या बंगल्यावर जाऊन ताकद दाखविणाऱ्या युवासैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शाबासकी”