आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गुरू माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत. ते जे बोलतात तेच करतात. आज देश मोठ्या हिंदूविरोधी संकटाशी सामना करत आहे. त्यामुळे आजच्या घडीला राज ठाकरेंसारख्या नेत्याची गरज आहे, अशी माहिती कांचनगिरीजी यांनी माध्यमांशी चर्चा करताना दिली.
देशाच्या फाळणीनंतर जम्मू-काश्मीरमधील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जर आतापासूनच त्यांच्या बाजूने उभे राहिलो नाही तर 10 वर्षांत ते शरणार्थी म्हणून राहतील. आता हिंदूंचे अस्तित्व कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही सर्वच पक्षातील नेत्यांना भेटून मार्गदर्शन करत आहोत, असं कांचनगिरीजी यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा
राज त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची हिंदुराष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे. त्यांच्या मनात उत्तर भारतीयांबद्दल प्रेम आहे. परप्रांतीयांबद्दल त्यांच्या मनात काही गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याचे आम्ही प्रयत्न केले. राज ठाकरे यांच्या मनात परप्रांतीयांविरोधात कोणताही द्वेष नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवलं. स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर ते बोलत असतात. परप्रांतीयांबद्दल कोणत्याही पद्धतीचा द्वेष मला त्यांच्या बोलण्यातून जाणवला नाही, असंही कांचनगिरीजी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा
विदर्भातही मनसेचा जोर वाढला; अनेकांचा मनसेत प्रवेश
शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोमणा