आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पंजाबमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरून पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
“काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे हे आम्हाला माहिती नाही.” असं म्हणत “पक्षातील आमचे लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिताजी पार्टी सोडून निघून गेल्या. जितिन प्रसाद यांना दुसऱ्या पक्षात मंत्रालय मिळाले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. आता प्रश्न पडतो की, ते का सोडत आहेत? आपलीच काही तरी चूक होत असेल, ज्यामुळे अनेक जण पक्ष सोडत आहेत. माझ्या मते पक्षाला नेतृत्व नसल्यामुळे ही गळती होत आहे, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
“मी काँग्रेससोबतच आहे. काँग्रेसचे नुकसान म्हणजे देशाचा पाया कमकुवत होण्यासारखे आहे. मागच्या वर्षी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून प्रश्न उपस्थित केले, त्या नेत्यांच्या बाजूने मी बोलत आहे. तेव्हापासून पक्ष हायकमांडच्या कारवाईची वाट पाहात आहे. पक्षामध्ये अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीची निवडणूक असावी अशी आमची इच्छा आहे, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा लहान फोटो; मनसेने केली भाजपवर नाराजी व्यक्त
ग्लेन मॅक्सवेलची विस्फोटक खेळी; आरसीबीचा राजस्थानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
काँग्रेसला मोठा धक्का; 11 समर्थक दिल्लीकडे रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण