Home महाराष्ट्र चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चीनच्या वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ तून टीका केली आहे.

भारताच्या सर्व सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

भारत सारख्या देशात अधूनमधून कसल्या ना कसल्या तरी लाटा येतच असतात. कोरोनाच्या लाटेचा जोर कायम असतानाच देशात चीनविरोधी संतापाची लाट उसळली आहे, पण काही संताप हे षंढ असतात. असे षंढ संताप चीनच्या बाबतीत अनेकदा निर्माण झाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग दोन वर्षांपूर्वी अहमदाबादेत पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून आले होते, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतच्या आत्महत्येबाबतआरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन; म्हणाला…

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केले ‘हे’ आरोप

आता ‘आशा’ फक्त मनसेकडूनच; विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

पंतप्रधान तर लांबच… पुढच्यावेळी शिवसेनेचा मुंबईत महापौर तरी बसवा- नितेश राणे