मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोविडची लागण झाली पण कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. तर दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीमही राबवली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असं अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, अजित पवार गुरुवारी मुंबईत महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
“पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ कार अपघातात 2 जण ठार”
भाजपनं दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण
दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला; शिवसेनेचा टोला
“राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात”