Home महाराष्ट्र “पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ कार अपघातात 2 जण ठार”

“पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ कार अपघातात 2 जण ठार”

कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील जखिणवाडी गावच्या हद्दीत मारूती कारला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय 48, रा.भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (वय 50, रा.काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर अश्विनी श्रीहरी वाघमारे (वय 21, रा.भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतुर (वय 31, रा.गंगानतर, फुरसुंगी, ता.हवेली, जि.पुणे), रागिनी वाघमारे (रा.भेकराईनगर, हडपसर, पुणे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसाकंडून मिळालेली माहिती अशी की, चालक फुलचंद चतुर हे श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे यांना घेऊन कारने पुण्याहून बेळगाव येथे औषध आणण्यासाठी निघाले होते. आज पहाटे जखिणवाडी गावच्या हद्दीत मळाईदेवी पतसंस्थेसमोरील चाैकात कारच्या समोरून डाव्या बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक बसली. यामध्ये श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात नेले असता त्यांता मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितलं. तर फुलचंद चतुर, अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे हे किरकोळ जखमी झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. अपघात होताच वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपनं दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला; शिवसेनेचा टोला

“राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात”

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार का? यावर शरद पवार म्हणतात….