मुंबई : सध्या राज्यात संभाजीनगरच्या नामांतरचा मुद्द्यावरुन राजकीय वातावरन चांगलच तापलं आहे, महाविकासआघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास विरोध आहे. तर, शिवसेनेकडून ही आम्ही संभाजीनगर असे नाव करणारच असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो, पण निर्णय घेण्यात आला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन
“सत्तेसाठी एवढी लाचारी?, कुठे फेडाल ही पापं?”
सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला
कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख