Home महाराष्ट्र “हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?”

“हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?”

मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेसमध्ये ‘सामना’ रंगू लागला आहे. औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, असं म्हणत राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?,” असा सवालही थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच- संजय राऊत

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन

“सत्तेसाठी एवढी लाचारी?, कुठे फेडाल ही पापं?”

सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला