पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी बैठकीत सांगितलं आहे. तसेच या बैठकीमध्ये कोरोना संदर्भात मोठी चर्चा झाली असून, कोरोना संकटाचा सामना एकजूटीने कसा होईल, यावर चर्चा केली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.
दरम्यान, तसेच मास्कबाबत जनजागृतीची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आबांच्या सुपुत्रासोबत आता पत्नी सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण
अपयशाचं खापर देवावर फोडणं हे कसलं हिंदुत्व?; संजय राऊतांचा अर्थमंत्र्यांना सवाल
खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर