मुंबई : करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होतं. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ मधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व?, असा सवाल करत देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
नोटाबंदी ते लॉकडाउन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था मरुन पडली आहे. मात्र, याचं खापर सीतारामन यांनी थेट देवावरच फोडलं. त्यामुळं सरकार यात काय करणार? अशी भूमिका मांडणारं हे सरकार टोकाचं देवभोळं आणि धर्माधिष्ठित असल्याचा हा परिणाम आह, असं संजय राऊत यांनी रोखठोक मधून म्हटलं आहे.
हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. कारण, देवानचं करोनाचं संकट आणलं असेल तर देवच करोनाग्रस्तांना बरं करेल मग आपण लस तरी का शोधायची? असा सवाल करताना भारताच्या अर्थमंत्र्यांचं हे विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्या देशाला शोभणारं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर
“एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं”
पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार
राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘ही’ नवीन मोहिम राबवणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे