भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

0
418

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार , असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

भ्रष्टाचारी लोकांच्या हातातच भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे सूत्र आहे. हे महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहेत. यांच्या स्वत:च्या तोंडाला शेणाचा वास आहे आणि हे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेणार. यांचा खेळ संपलेला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : तुरूंगात दणके बसले नाहीत, याबद्दल सरकारचे आभार माना; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला

रोज ही प्रकरणं येत असतील. सुरूवात या लोकांनी केली होती, आता शेवट आम्ही करू. प्रकरण फक्त एका किरीट सोमय्याचं नाहीये. भाजपच्या 28 प्रमुख लोकांची प्रकरणं आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत भाजच्या कुठल्या 28 नेत्यांची प्रकरणं बाहेर काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

महत्वाच्या घडामोडी –

योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उभारणार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

“हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण, हे लवकरच कळेल”

“प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here