“ओडिशामध्ये द बर्निंग ट्रेनचा थरार, कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडीला धडकली, 50 जणांचा मृत्यू, तर 179 जखमी”

0
225

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बालासोर : ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस समोरून येणाऱ्या मालगाडीला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात रेल्वे गाडीचे अनेक डब्बे पलटी झाले आहेत.

या अपघातामध्ये 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर 179 जण जखमी झाले आहेत. या जखमींना सोरो सीएचसी, गोपालपुर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी शिजतंय; शरद पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार ‘वर्षा’वर दाखल

कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. हा अपघात जोरदार भीषण झाला असून, तिथं प्रचंड हाहाकार माजला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

संजय शिरसाटांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर, आता सुषमा अंधारेंचा, देवेंंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाल्या…

“मोठी बातमी! शरद पवार, अचानक मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, चर्चांना उधाण”

भाजप पक्ष माझा थोडी आहे, मी…; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here