“वरात दारात येऊन थांबली, अन् नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून थक्क व्हाल”

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बिहार : आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे बातम्या व्हायरल होताना दिसत आहे. अशीच एक लग्नातील धक्कादायक बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याचं वेड असतं. मात्र लग्नामध्ये असे काही किस्से घडतात की, सर्वजणच हैराण होतात.
सध्या देखील असाच एक प्रकार बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून समोर आला आहे.

ही बातमी पण वाचा : “शरद पवारांच्या गुगलीला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, पवार साहेबांनी मान्य केलं की,…”

लग्न थोड्याच वेळात सूरू होणार होत. वरात दारात येऊन उभा राहिली आणि त्यावेळी नवरीला समजलं की, नवरदेव म्हणून पहायला आलेला तरुण वेगळाच होता. तरुणीचं ज्या व्यक्तीसोबत लग्न ठरलं होतं, तो हा नव्हताच. त्यामुळे हे पाहताच नवरीने आणि तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला आणि साखरपुड्यासाठी खर्च केलेले 1 लाख रूपये देखील परत मागितले.

नवरीकडच्या लोकांनी वराला घेरलं. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. मात्र गावातील इतर लोकांनी त्यांचं भांडण सोडवलं. त्याचबरोबर गावातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस पथक गावात आले आणि सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर आम्ही थेट पंतप्रधान मोदींना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांचं मोठं विधान

“वर्ल्ड कप आधीच टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर?”

शरद पवारांनी भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारचे पालकमंत्रीही ठरवले होते; भाजपच्या आणखी एका नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here