मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला. तसंच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता खासदार संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी”, असंही संभाजीराजे म्हणाले.
आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी.
सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
दरम्यान, छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही. भाजपला या कृतीबद्दल महाराष्ट्राची आणि शिवप्रेमी जनतेची माफी मागावीच लागेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
हा तानाजी मालुसरेंचाअपमान शिवरायांवर प्रेम करणारी जनता खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे
रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी होणार
राजिनामा देताच सांगलीच्या महपौर संगिता खोत यांना झाले अश्रू अनावर
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक