Home क्रीडा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक

मुंबई : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी मालिका खिशात घातली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माचे तडाखेबाज शतक आणि विराट कोहलीच्या 89 धावांच्या जोरावर भारताने 7 विकेटने हा सामना जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक केलं.

विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधला महान खेळाडू आहेत तर रोहित शर्मा हा ऑलमोस्ट टॉप 5 फलंदाजांपैकी एक आहे. त्या दोघांची तुलना इतर कोणाशीच करता येणार नाही, असं अ‌ॅरोन फिंचने म्हटलं आहे.

भारतीय संघात सध्या अनुभवी आणि चांगले खेळाडू आहेत. अनेकदा मॅचविनर खेळी करून ते खेळाडू संघाला विजय मिळवून देतात. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघात नसताना रोहित शर्माचे हे शकत अनेक अर्थांनी खास आहे, असंही फिंच म्हणाला.

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात रोहित शर्माने 128 चेंडूत 119 धावा करत मोलाची खेळी केली.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेने आम्हाला तशी कोणतीही ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक

…म्हणून झाली उर्वशी रौतेला ट्रोल

गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं; धनंजय मुंडे झाले भावूक

“नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना”