नवी दिल्ली : शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र आहे. राजकारणापलीकडे जात मित्राला टिकवून ठेवण्यासाठी भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद न देणं ही चूकच होती, असं म्हणत भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला. News18इंडियाच्या चौपाल या कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही एकत्र होतो. भाजपचा हा जुना आणि विश्वसनीय मित्र भाजपपासून दुरावणं हे योग्य झालं नाही, असंही सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले.
महाराष्ट्रातली सत्ता हातातून गेल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय. त्या धक्क्यातून पक्ष अजूनही सावरत नाहीये.
दरम्यान, भाजपला दूर ठेवत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता मिळवली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र ते पाळलं नाही असा आरोप शिवसेनेने केला होता.
महत्वाच्या घडामोडी-
-“सामना हा संताजी-धनाजी प्रमाणे आहे”
-शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका; त्यांना योग्य तो न्याय द्या- चंद्रकांत पाटील
-मी राष्ट्रवादी नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक- एकनाथ खडसे
-माझी जात वंजारी आहे आणि हा कायदा माझ्या जातीविरुद्ध- जितेंद्र आव्हाड