आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा-मनसेमध्ये जागांसाठी ‘फॉर्म्युला’ ठरला आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक 5 ऑक्टोबर रोजी होत आहे. जिल्हा परिषदेच्या 15 व पंचायत समितीच्या 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. यामध्ये दोन्ही पक्षांनी जागांसंदर्भात तडजोड केली आहे. ज्या ठिकाणी भाजपाचा प्रभाव जास्त आहे तिथे मनसे उमेदवार देणार नाही आणि जिथे मनसेचे वर्चस्व आहे. तिथे भाजपा उमेदवार देणार नाही असे निश्चित करण्यात आल्याची माहिती कपील पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्ह्यतील 144 उमेदवार निवडणुकीसाठी मैदानात उतरल्याच चित्र आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”
“मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”
“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेस जिवंत, अन्यथा हे मेले असते”
आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात; कोल्हापूरात सोमय्यांचा एल्गार