Home नागपूर “उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेस जिवंत, अन्यथा हे मेले असते”

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेस जिवंत, अन्यथा हे मेले असते”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : नागपुर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

‘कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर हे मेले होते, एका एका व्यक्तीला पुरून उरणार आहे मी’, असं खळबळजनक विधान आशिष जयस्वाल यांनी केलं आहे.

काँग्रेस नेते मेले होते उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतल्यानंतर ते जिवंत झाले होते. यांच्या दोन्ही पार्टीमध्ये गळती लागली होती. तुम्ही लोकं मेलेला होता, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, सर्वजण सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात यायला तयार होते. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं त्यामुळं मेलेले लोकं जिवंत झाले आहेत. शिवसेनेच्या मतदारसंघात तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, एका एकाला मी पुरुन उरणार आहे, असं आशिष जैस्वाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं असून सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. तरी या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अद्यापही धुसफूस असल्याची प्रकरणं समोर येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात; कोल्हापूरात सोमय्यांचा एल्गार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान

संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनीही त्यांच्याकडून शिकावं- किरीट सोमय्या

…तर 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास