“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

0
177

वर्धा : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. यावरून काॅंग्रेस नेते सुनिल केदार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सुनिल केदार सेवाग्राममधील बापू कुटी येथे गांधी जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारला अहिंसेच्या ताकदीचा विसर पडलाय. त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवू. ते कधी कोसळतील हेही त्यांना कळणार नाही, असं म्हणत सुनिल केदार यांनी भाजपा खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या देशात अजूनही लोकांना हिंसा आणि अहिंसा यातील फरक कळत नाही. त्यांना अहिंसेच्या ताकदीचा विसर पडला असेल तर येणाऱ्या काळात लोकशाहीच्या माध्यमातून हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना अहिंसेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं म्हणत सुनिल केदार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?- रोहित पवार

उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज; महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे- यशोमती ठाकूर

“धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here