आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी आणि सोशल इंजिनिअरिंग सुरू केले आहे. अशातच राष्ट्रवादीकडून शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजाला संधी मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरण्यात आली होती. अखेर ही मागणी मंजुर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्षपदी शरीफउद्दीन ख्वाजा यांची निवड केली.
पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी शरीफउद्दीन ख्वाजा यांचे सहकार्य राहील. यासोबतच बाळासाहेब नायकवडी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेब नायकवडी हे पक्षाची ध्येय-धोरणे सर्वासामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा : नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. ख्वाजाभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोनवेळा नगरसेवक राहिलेले आहेत. शिवाय त्यांच्या मुस्लिम समाजात चांगला जनसंपर्क देखील आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवत शिवसेना, भाजप, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर छोट्या मोठ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेली 25-30 वर्ष महापालिकेच्या सत्तेत एकत्र असलेले शिवसेना-भाजप आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात पुन्हा भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा
राष्ट्रवादीबरोबर समझोता न झाल्यास काँग्रेससोबत निवडणूक लढवू; शिवसेना नेत्याचं विधान
“अखेर ‘मातोश्री’नं घेतली दखल; शिवसेनेच्या ‘या’ नाराज आमदाराचा राष्ट्रवादीतील प्रवेश थांबवला”