Home देश नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आधी नारायण राणेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता नारायण राणेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.

नारायण राणें सोबत आधी केवळ 2 कमांडो होते. मात्र आता सीआयएसएफच्या 8 कमांडोंचे सुरक्षा कवच राणेंच्या भोवती असणार आहेत, तसंच सुमारे 34 सशस्त्र पोलिस 24 तास पहारा देणार आहेत.

हे ही वाचा : पुण्यात पुन्हा भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. नाशिकमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली होती. राणेंना महाड न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना जामिन मंजूर केला होता. यानंतर अनेक ठिकाणी नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते तर मुंबईतील त्यांच्या बंगल्यासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते. याच सगळ्या प्रकारानंतर राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला होता. नुकताच हा अहवाल गृहमंत्रालयाला प्राप्त झाला आहे.

दरम्यान, या अहवालानुसार राणेंना वाढलेला धोका लक्षात घेवून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सीआयएसएफचे 8 कमांडोचे कवच राणे यांना सुरक्षा देणार आहे. आता शनिवारपासून राणेंचे सुरक्षा कवच ‘झेड’ श्रेणीचे असणार आहे. त्याबाबतचे आदेश सीआयएसएफ देण्यात आले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीबरोबर समझोता न झाल्यास काँग्रेससोबत निवडणूक लढवू; शिवसेना नेत्याचं विधान

“अखेर ‘मातोश्री’नं घेतली दखल; शिवसेनेच्या ‘या’ नाराज आमदाराचा राष्ट्रवादीतील प्रवेश थांबवला”

शिवसेनेत राजकीय भूकंप; 58 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा