Home महाराष्ट्र आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्याबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे.

गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे या आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये हीच अपेक्षा, असं म्हणत थोरात यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सकल महसूल उत्पन्नाच्या 10 टक्के म्हणजेच 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये काय अंतर्भूत आहे हे त्यांनी सांगितले नाही. देशाच्या एकंदर प्रगतीकरता व कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्याकरिता जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम केंद्र सरकारने देण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही- एकनाथ खडसे

लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही- एकनाथ खडसे

आपल्याला नियमांचं पालन करुन या युद्धाचा सामना करायचा आहे- नरेंद्र मोदी

भाजपाने ऐनवेळी बदलला विधानपरिषद उमेदवार; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला उमेदवारी