मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर नितेश राणे यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे.
हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मेट्रो, बेस्टच्या कार्यक्रमात करोना दिसत नाही का? असा सवाल करत मेट्रोच्या कार्यक्रमात गर्दी दिसत नाही, काल बेस्टचा कार्यक्रम झाला तिथे स्वतः मुख्यमंत्री होते तिथे यांना गर्दी दिसत नाही. यांच्या पार्ट्या चालतात तिथे या लोकांना करोना दिसत नाही. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन झालं तिथे यांनी गर्दी दिसत नाही. पण जिथे जिथे आमचे सण आले त्यावेळी यांना करोना दिसतो. मुंबईमध्येही अशीच अवस्था केलेली आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
“राज्यपालांशी आम्ही बोललो की, सणांच्या निमित्त जे होर्डिंग्ज लागतात ज्यावर या सगळ्या गणेशोत्सवांतील आर्थिक सगळी गणितं बांधेलेली असतात, आता त्या होर्डिंग्जवर देखील बंदी घातलेली आहे. म्हणजे होर्डिंग लावल्यावर कुठला करोना पसरतो आणि या लोकांना कुठल्या कंपाउंडरने ते सांगितलेलं आहे? याचं तरी उत्तर ठाकरे या सरकारने आम्हाला दिलं पाहिजे, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरची मोठी कारवाई; अकाऊंट सस्पेंड
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर
“उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”
मोठी बातमी! एकनाथ खडसेंवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपाचार सुरू