मुंबई : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातही 30 जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवीन सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत.
3 जूनपासून या गोष्टी सुरू होणार… (मिशन बीगिन अगेनचा प्रथम टप्पा)
1. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी असणार आहे.
2. गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र त्यासाठी आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना
3. सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती 5 टक्के होती
5 जूनपासून खालील गोष्टी सुरू होणार… (मिशन बीगिन अगेनचा दुसरा टप्पा)
1 मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार
2 कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार
3 दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे
4 खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना
5 अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई
6 खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते
जूनपासून कोणत्या गोष्टी सुरू होणार… (मिशन बीगिन अगेनचा तिसरा टप्पा)
1 सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी उपस्थिती चालवण्यास परवानगी, उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय
2 कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना
3 अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी 1 चालक 1 प्रवासी, रिक्षा 1 चालक 2 प्रवासी, खाजगी चारचाकी 1 चालक 2 प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी
कंटेंनमेंट झोनमध्ये कोणताही शिथिलता नाही
कंटेंनमेंट झोनमध्ये कोणताही शिथिलता नाही
1 मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट
2 यात संचारबंदी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूट
3 ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी
4 शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांची वापर करता येणार, दूर जाण्यास मनाई
खालील बाबींवर संपूर्ण राज्यात बंदी कायम
1 शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
2 आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
3 मेट्रो बंद राहणार
4 स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown.#MissionBeginAgain pic.twitter.com/3JJrWIWV4J
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
तो निर्णय अजित पवार यांचाच होता- प्रफुल्ल पटेल
…म्हणून शिवसेना आज भाजपासोबत नाही- संजय राऊत
“सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू”