Home महाराष्ट्र “ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”

“ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही यावेळी शिवसेनेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, पवार हे 80 वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”; सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

आमचे साहेब महाराष्ट्राची शान आहेत; राजकारणात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही- नवनीत राणा

“बिबट्याल्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार; स्वत: बॅटरी व काठी घेऊन केली पाहणी”

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का; मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केलं दाखल