सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्द तसा राजकीय पटलावर परिचित आहे. स्वतः जयंत पाटील यांच्याकडूनही ‘करेक्ट कार्यक्रम करतो’ हा शब्दप्रयोग नेहमी होतो. सांगलीत सध्या याच आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत.
सांगलीतील या पोस्टर्सवर ‘किंग मेकर जे आर पी अर्थात जयंत राजाराम पाटील’ असा मथळा आहे. त्याच्या खालीच “टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच” असं लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. तसेच ही पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आमचे साहेब महाराष्ट्राची शान आहेत; राजकारणात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही- नवनीत राणा
“बिबट्याल्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार; स्वत: बॅटरी व काठी घेऊन केली पाहणी”
“धक्कादायक! नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आज्जी आणि लहान भावाची निर्घृण हत्या”