Home महाराष्ट्र सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा ‘मोठा निर्णय

सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा ‘मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची कॅबीनेट बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला. जनतेतून होणारी सरपंच निवड ठाकरे सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 9  हजार ग्रामपंचायत आणि सरपंच परिषद यांच्यांकडून जनतेमधूनच सरपंचाची निवड व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारने ग्रामपंचायतींची मागणी डावलून सरपंचाची निवड थेट जनतेतून न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्कालिन फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच निवड व्हावी यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, ठाकरे सरकारडून फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, शासनाने घेतलेला हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद उद्यापासून महाराष्ट्रात उमटलेले दिसतील, असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

..म्हणून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला एअरलाइन्समधून प्रवास करण्यास घातली बंदी

महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार

देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही- रुपाली चाकणकर

दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं- देवेंद्र फडणवीस