आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : “धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा”; करूणा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र निर्बंध नेमके काय असतील याबाबत महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. असं म्हणत रावणासारख दहा तोंडाने बोलणारे आणि चालणारे हे सरकार आहे. निर्बंधांच्या नावाखाली जनतेमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जर मुंबईत लॉकडाऊनची घोषणा केली, तर जनतेचे अतोनात नुकसान होणार आहे. या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? लॉकडाऊनमध्ये नुकसान झाल्यास सरकारने मदत करावी अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक”
“कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूकीत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्रींचा विजय”
पंकजाताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या; रोहित पवारांचा टोला