Home महाराष्ट्र …तर मी राजीनामा द्यायला तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

…तर मी राजीनामा द्यायला तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला.

शिवसेना आणि हिंदुत्व कदापी वेगळं होऊ शकत नाही, म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. मी याक्षणी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

हे ही  वाचा : “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप?; एकनाथ शिंदेंसह 40 आमदार सूरतहून गुवाहाटीत दाखल”

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी दोन्ही पद सोडायला तयार आहे. पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मना आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको. समोर या आणि सांगा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारणातील जन्मदात्री शिवसेनेवर तिचंच लाकूड वापरुन कोणी घाव घालू नका. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो. जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगदिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण, रिलायन्स रूग्णालयात दाखल”

…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता- अभिजीत बिचुकले

एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा खोचक शिवसेनेला टोला, म्हणाले…