उद्धव ठाकरेंबद्दल, बोलताना राज ठाकरे भावूक, म्हणाले, आमच्या नात्यात कोणीतरी…

0
818

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : झी मराठी या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये बोलताना, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

या शोमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देत असताना राज ठाकरे भावूक झालेलेे दिसले.

ही बातमी पण वाचा : ‘या’ कारणामुळे वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिनसलं

या शोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेला एक फोटोही यावेळी दाखवण्यात आला. यावर अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरेंना विचारलं की, काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून? असा प्रश्न विचारताच  राज यांनी भावूक होत उत्तर दिलं. खूप छान दिवस होते ते. काय माहित कुणी विष कालवलं. किंवा कुणाची नजर लागलीस असं उत्तर राज ठाकरेंनी यावेळी दिलं.

दरम्यान, त्यानंतर राज यांना गुप्तेंनी दुसरा प्रश्न विचारला. आता पुन्हा एकत्र येऊ शकत नाही? या प्रश्नाचं, राज ठाकरे काय उत्तर देणार? हे 4 जूनला पूर्ण शो प्रदर्शित झाल्यावरच बघायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत; राज ठाकरेंचा टोला

निवडणूकीत देवाला आणलं, तरी पराभव झाला, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजपला टोला

तब्बल 9 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताच, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here