आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या युतीवर भाष्य केलं आहे.
मनसेसोबत युती करायची असेल, तर भाजपच्या कोअर कमिटीसमोर त्याचा प्रस्ताव यावा लागतो, मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
‘मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसून तशी चर्चाही झाली नाही. अशी युती करायची असेल तर भाजपच्या कोअर कमिटीसमोर त्याचा प्रस्ताव यावा लागतो. 13 जणांची कमिटी यावर निर्णय घेत असते, त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणार नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य
ते मैदानात जिंकले, अन् तुम्ही मात्र…; ठाकरे गटातील खासदाराचा शिंदेंना टोला
अभिनेत्री प्राजक्ता माळी, शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घरी; मनसेत प्रवेश करणार?; राजकीय चर्चांना उधाण