“भाजप आणि ड्रग्ज पेडलर बद्दल बोलूया म्हणत, नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो”

0
346

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आर्यन खान अटक प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर दररोज आरोप करताना दिसत आहेत. अशातच नवाब मलिक यांनी आज पुन्हा ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंचे हात बळकट करा अन् सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकवा”

नवाब मलिक यांनी भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है, अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

नारायण राणेंनी शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची टीका

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार”

न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेट्सने पराभव; सेमी-फायनलचा मार्ग झाला आणखी खडतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here