मुंबई : दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल, असं आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना केलं.
महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने काल एका बैठकीचे आयोजन केले होते. दुरदृश्य प्रणालीवरही बैठक झाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं.
दरम्यान, ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का? असा प्रश्न नितीन राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
एक रात्र माझ्यासोबत घालव; अंकिता लोखंडेने केला निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा
“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”
“शरद पवार साहेब आता तरी खोटं बोलणं बंद करा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या”