तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो; मुख्यमंत्र्यांच जनतेला आवाहन

0
181

मुंबई : महाराष्टातलं लॉकडाउन हे कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. केवळ नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची बंधने कठीण करावी लागतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

आम्ही हे युद्ध जिंकणारच, कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध जिंकता येत नाही. त्यामुळे हे युद्ध आपण जिंकणारच यासह मी पुन्हा तुम्हाला शिस्त पाळण्याचं आवाहन करतो. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आपल्याला 14 एप्रिलपासून किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागणार आहे. किमान या शब्दावर मी मुद्दाम जोर देतो आहे. या काळात काही प्रमाणात निर्बंध करण्याबाबत सूचना दिल्या जातील. हा विचित्र व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो”

पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here