Home महाराष्ट्र पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड

पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड

मुंबई : लॉकडाऊन असताना देखील मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास केलेल्या वाधवान प्रकरणावरून आता राजकारण चांगलेच पेटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाधवान प्रकरणी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.

पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानच चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. येनकेन प्रकारे पवार साहेबांचं नाव कोणत्याही घटनेत घुसवून भाजप ची नेते-मंडळी आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेत आली आहेत. हा इतिहास आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाधवान कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांच्यात जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या परवानगीशिवाय वाधवान यांना यांना पत्र मिळणं अशक्य आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ

औरंगाबादेत शिवीगाळ करत युवकांनी केली पोलीसांना मारहाण; पाहा व्हिडीओ

शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा लोकांनी उपाशी राहावं का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल