आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शरद पवारांनी देखील संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या.
हे ही वाचा : “गोपीनाथ मुंडेंनी आपल्याला गरिबांची सेवा करण्याचा वारसा दिलाय, अन् तो आपण गावागावापर्यंत पोहोचवायला हवा”
मी केंद्रीय कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी सायंकाळी माझ्याकडे एक फाईल आली. देशात अन्नधान्यांचा साठा कमी असल्याने ब्राझीलवरून धान्य आयात करण्याची फाईल होती. शेतीप्रधान देशात दोन वेळेचे अन्न मिळू शकत नाही मला वाईट वाटले. मी स्वाक्षरी केली नाही. पण त्या फाईल मधला मजकूर वाचून मी अस्वस्थ झालो होतो, असं शरद पवार म्हणाले.
दूसऱ्या दिवशीही मी देशात अन्नधान्य कमतरतेची परिस्थिती कशी बदलता येईल याचा विचार करत होतो. पण त्यानंतर आम्ही देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला. शेतीत वेगवेगळे प्रयोग आणि योजना राबवण्यात आल्या. नंतर आज हा देश 18 देशांना अन्न धान्य पुरवणारा देश झाला. हे सर्व आपल्या शेतकऱ्यांनी केलं आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेचा डबल धमाका; शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
“…तर 48 खासदार असलेला शिवरायांचा मावळा पंतप्रधान का होऊ शकत नाही?”
“कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता”