आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच आर्यन खान प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर टीका केली होती. याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘सुप्रिया सुळे यांना चरसी आर्यन खानचा पुळका येणे स्वाभाविक आहे म्हणा… बापाच्या नावावर आणि जीवावर राजकारणात असलेले सुप्रिया सुळे यांच्यासारखे फुटकळ नेते उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखवतात हे पाहून गम्मत वाटते’ असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : ‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा
दरम्यान, जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला 26 दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय, असा सवाल केला होता. असा सवाल केला आहे. केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचे आणि देशाचे नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
बापाच्या नावावर आणि जीवावर राजकारणात असलेले @supriya_sule
यांच्यासारखे फुटकळ नेते उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखवतात हे पाहून गम्मत वाटते— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 31, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘हे’ सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा; बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी उभे असतील तर, याहून दूर्देवी काही असू शकत नाही- नवाब मलिक
शिवसेने नंतर आता राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; माथेरानचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत