मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला. तसंच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
हा छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा अपमान आहे पुस्तक प्रकाशनानंतर दिल्ली भाजपने ही दुसरी अक्षम्य कागाळी केली आहे. हे जाणीवपूर्वक केलं जातंय, असं म्हणत सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.
छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही. भाजपला या कृतीबद्दल महाराष्ट्राची आणि शिवप्रेमी जनतेची माफी मागावीच लागेल, असंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्कींग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी होणार
राजिनामा देताच सांगलीच्या महपौर संगिता खोत यांना झाले अश्रू अनावर
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक
शिवसेनेने आम्हाला तशी कोणतीही ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक