Home महाराष्ट्र ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती! पंकजा मुंडेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती! पंकजा मुंडेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असं आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा :“राष्ट्रवादीला मिळालं युवकांचं बळ; औरंगाबादमध्ये ‘या’ नेत्यासह कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

‘ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सन्मानीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित झाला आहे, ऑर्डर अजून प्राप्त नाही पण ट्रिपल टेस्ट नाही झाली हा उल्लेख आहे. या संदर्भात सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरीही घ्यावे. ओबीसी ची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघाला पाहीजे. विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढावा’, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन उचलत नाहीत- नारायण राणे

मनसेत इनकमिंग सुरूच; बेलापूरातील अनेक नागरिकांचा मनसेत प्रवेश