संजय राऊतांची शिंदे – फडणवीसांवर टीका; म्हणाले,राज्यात नामर्दांचं सरकार…

0
140

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ‘सुलतान’ असा उल्लेख करत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की…; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्यातील सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग आहेत. इकडून तिकडे खोके पोहोचवणं हेच या सुलतानांचं काम आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दत्ता दळवी तुरुंगात आहेत.. दोन-चार लोक आले. त्यांनी दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या. ही त्यांची मर्दानगी… भाड्यानं माणसं घेतात… दत्ता दळवी बाहेर येतील. जर खरा मर्द असेल तर गाडी फोडून तिथंच थांबा. पळून का जाता थांबा ना तिथं… राज्यात नामर्दांचं सरकार आहे, असा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

‘…तर फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

ठाकरे – शिंदे गटात राडा ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच दोन्हीं गट भिडले

गजानन कीर्तिकरांवर टीका करताना, शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here