Home महाराष्ट्र शिवसेनेच्या भगव्याला कवटाळून उस्मानाबादेत कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या; राजकीय वर्तुळात हळहळ

शिवसेनेच्या भगव्याला कवटाळून उस्मानाबादेत कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या; राजकीय वर्तुळात हळहळ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणारे शिवसैनिक दत्तात्रय नारायण वऱ्हाडे  यांनी आत्महत्या केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

दत्तात्रय वऱ्हाडे यांनी 1984 साली उस्मानाबाद शहरात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. अत्यंत सामान्य राहणी, तंगीची आर्थिक परिस्थिती असतानाही मैलोन् मैल पायी आणि सायकलवर स्वारी करत त्यांनी शिवसेनेचा प्रचार केला. कोणतीही निवडणूक असली तरी शिवसेनेच्या प्रचारासाठी कायम पायाला भिंगरी लावून फिरणारे कट्टर शिवसैनिक अशी दत्तात्रय यांची प्रतिमा होती.

हे ही वाचा : पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व; एका जागेवर भाजपचा विजय

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दत्तात्रय हे अत्यंत हलाखीत जीवन जगत असल्याचे वृत्त माध्यमांतून झळकले होते. मात्र आज पहाटे 4 जानेवारी रोजी त्यांनी शिवसेनेच्या भगव्यानंच गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली. उस्मानाबादेतील त्यांच्या घराशेजारील झाडाला भगव्याच्या सहाय्यानेच त्यांनी गळफास घेतला.

महत्वाच्या घडामोडी – 

‘शिवतीर्थ’ वरील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; राज ठाकरेंकडून आगामी 10 दिवसांचे कार्यक्रम रद्द”

“शिवसेनेचं धनुष्य आता आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

‘या’ मराठी चित्रपटात राज ठाकरे यांनी साकारलीये मुख्य भूमिका, तुम्ही बघितलंत कधी त्यांचं हे रूप?