नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरच्या मुद्दयावरून भारतीय अर्थव्यवस्था आणि पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर टीका करत मोदी हे धर्माचे राजकारण करतात, असा आरोप केला होता. यावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंंगने शाहिद आफ्रिदीला उत्तर दिलं आहे.
शाहिद आफ्रिदी माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही बोलला, ते खूपच चुकीचं आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आफ्रिदीच्या करोनाबाबतच्या उपक्रमाला आम्ही मदतीचे आवाहन करावे असे त्याने स्वत: आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आवाहन केलं होतं, असं हरभजन सिंग याने म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं, कोरोनाविरूद्धचा लढा हा धर्म, जात किंवा सीमेच्याही पलीकडचा आहे. त्यामुळे आमच्या डोक्यात स्पष्ट होते की आम्ही ही मदत कोरोनाबाधितांसाठी करत आहोत. पण हा माणूस आमच्याच देशाबद्दल वाईट बोलतो. आता खड्ड्यात गेला शाहिद आफ्रिदी…त्याला भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावं, असंही हरभजन म्हणाला.
महत्वाच्या घडामोडी-
लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?
“साईंचं सोनं देशाच्या उपयोगी येत असेल तर भक्तांना आनंद होईल”
…तर काय भलं होणार आपलं; निलेश राणेची राज्य सरकारवर टीका
उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; किरीट सोमय्यांच मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र