आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं छापेमारी केली. तसंच पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आमचे संयुक्त कुटुंब आहे. अजित दादांच्या बहिणी, नातेवाईक आमच्याच कुटुंबाचे सदस्य आहेत. ते आमचेही नातेवाईक आहेत. मात्र संघर्ष करणे आमचे कुटुंबप्रमुख शरद पवारांची खासियत आहे. त्यांच्या शिकवणीनुसार पवार कुटुंब संघर्ष करतच पुढे आला आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. सह्याद्री कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही. पवार कुटुंब संघर्ष करतच राहणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
दरम्यान, नवरात्र उत्सव निमित्त ठाण्यातील गणेशवाडी येथील आई श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांना पाहुणचार करू, पण… ; नारायण राणेंचा खोचक टोला
‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तायारी; संभाव्य उमेदवारांची यादी तयार
‘…अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा
भाजपविरोधात राष्ट्रवादी लढण्यास तयार, होऊ दे सामना; नवाब मलिक यांचं खुलं आव्हान