Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना पाहुणचार करू, पण… ; नारायण राणेंचा खोचक टोला

मुख्यमंत्र्यांना पाहुणचार करू, पण… ; नारायण राणेंचा खोचक टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गात चिपी विमातळाचा उद्घाटन होणार आहे. मात्र विमानतळ सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होण्याच्या आधीच त्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यावरुन आता केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनला टोला लगावला आहे.

“तुम्ही या, उद्घाटन करा. पण हे आम्ही केलंय हे मान्य करा. उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमातही आम्हीच हे काम केल्याचं सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमचा वाद नाही. वैर नाही. त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे. सिंधुदुर्गाच्या म्हावऱ्याचा पाहुणचार करू, पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, चिपी विमानतळ लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये मीच सिनिअर  असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तायारी; संभाव्य उमेदवारांची यादी तयार

‘…अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

भाजपविरोधात राष्ट्रवादी लढण्यास तयार, होऊ दे सामना; नवाब मलिक यांचं खुलं आव्हान

“महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलेले तिघेही दरोडेखोर”