आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंनी, शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या नेत्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यास सूरूवात केली आहे.
अशातच आता ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेले हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने व माजी खासदार राजू शेट्टी यांना आवाहन देईल, अशा नेत्याला आता ठाकरेंनी जवळ केलं आहे. 2019 च्या निवडणूकीमध्ये मध्ये धैर्यशील माने व राजू शेट्टींना आवाहन देणाऱ्या हाजी अस्लम बादशाह सय्यद यांनी शिवबंधन हाती बांधलं.
हे ही वाचा : Election Result! “मोदींना मोठा धक्का; ‘या’ राज्यात काँग्रेस आघाडीवर”
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यावेळचे खासदार राजू शेट्टी यांना पराभूत केले होते. तर हाजी अस्लम बादशाह सय्यद यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढली होती. मात्र त्यांना या निवडणूकीत पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र पराभूत होऊनही सय्यद यांना मिळालेली मतं निर्णायक होती. कारण राजू शेट्टी यांना मिळणारी मतं ही सय्यद यांच्या पारड्यात पडली होती.
दरम्यान, हे चित्र पाहता उद्धव ठाकरेेंनी सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला.
हातकणंगले मतदारसंघातील हाजी असलम बादशाह सय्यद यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.#ShivSena pic.twitter.com/7QytOZg8Hr
— Shivsena Communication (@ShivsenaComms) December 6, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
Election Result! “मोदींना मोठा धक्का; ‘या’ राज्यात काँग्रेस आघाडीवर”
कर्नाटकविरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कर्नाटक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून काळं फसलं