एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय, फडणवीसांनी सरकारला सांगितला मार्ग; म्हणाले…

0
361

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील एसटी कर्मचारी जमायला सुरुवात झालीय.याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष करत एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढण्याबाबत सल्ला दिला आहे.

एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “टायगर अभी जिंदा है; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराला संदेश; चर्चांना उधाण”

राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी’, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनीही यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

महत्वाच्या घडामोडी –

अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल

शिवशाही नव्हे, मोगलाई सुरू आहे, हम करे सो कायदा चालणार नाही; चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा

वेळ आल्यावर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here