आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. शिवसेनेची राष्ट्रवादीशी आघाडी ही तडजोड आहे; टिकणारी नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केले. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वथता आहे. यावरून आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिलाय.
‘शिवसेनेला आपले भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहू नये. शिवसेना आणि भाजपाने अडीच वर्षांच्या फार्म्युल्यावर एकमत करून एकत्र आलं पाहिजे’, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
‘मी 1998 साली शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणे योग्य नाही. उलट, काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. अनंत गीते यांचा आरोप चूक आहे, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“कोल्हापूरकरांनी पुन्हा म्हटलं, आमचं ठरलंय, सोमय्यांना एन्ट्री देणार नाहीच”
हसन मुश्रीफांची चिंता पुन्हा वाढण्याची शक्यता; ‘या’ तारखेला किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार
भाजपचा शिवसेनेला अणखी एक धक्का; मुंबईत अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
“…म्हणून कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारलं”