स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज होणार स्वस्त; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
285

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट कमी केला आहे. नवे दर मंगळवारपासून लागू होणार आहेत. यानंतर कार आणि इतर MCLR लिंक्ड कर्जे स्वस्त होतील.

सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एसबीआयने MCLR  सलग 8 वेळा कपात केली आहे. फंडात कमी झालेल्या खर्चाचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी आम्ही एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं एसबीआयने सांगितलं आहे.

आता एसबीआयमध्ये MCLR वार्षिक 7.90 टक्के इतका होईल. जो आतापर्यंत 8 टक्के आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या मार्केट शेअरमधील 25 टक्के भागावर त्यांची पकड आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्याच आठवड्यात रेपो रेट कायम ठेवल्याचं सांगितलं आहे.

MCLR मध्ये कपात केल्याने व्याजदर कमी होतात. मात्र यामुळे सर्व कर्ज घेणाऱ्यांचे कर्ज कमी होणार नाही. नव्याने कर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं एसबीआयने सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो पण आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही”

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव

“शिवसेनेनं हिंदुत्त्व विकून मुख्यमंत्रिपद घेतलंय”

नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली- विनायक राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here